Ad will apear here
Next
रत्नागिरीच्या ‘पुलोत्सवा’त बहुरंगी कार्यक्रमांची मेजवानी; आठ ते १० नोव्हेंबरदरम्यान आयोजन
स्वरांकित पुलं

रत्नागिरी :
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यंदाही रत्नागिरीत ‘पुलोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरीतील आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिक या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आठ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘स्वर आणि स्वरांकित सुहृद ही पुलं आणि सुनीताबाईंच्या प्रेमाची स्थाने, तर काव्य आणि नाटक हे हळवे कोपरे. याच मर्मस्थानांची गुंफण यंदाच्या पुलोत्सवात आहे,’ असे आर्ट सर्कलतर्फे सांगण्यात आले.

आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ‘स्वरांकित पुलं’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांसारख्या अनेक कलाकारांबरोबर पु. ल. देशपांडे यांचे ऋणानुबंध होते. ते अधोरेखित करणारा हा कार्यक्रम आहे. यात अभिषेक काळे आणि आदित्य मोडक हे गायक सहभागी होणार असून, पं. विश्वनाथ कान्हेरे (ऑर्गन) आणि रामकृष्ण करंबेळकर (तबला) यांची साथ असेल. अनघा मोडक निवेदनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

न ऐकलेल्या कवितांची मुक्त मैफल नऊ नोव्हेंबरला सादर होणार आहे. ‘इर्शाद’ असे त्या कार्यक्रमाचे नाव असून, संदीप खरे आणि वैभव जोशी त्यात कविता सादर करणार आहेत.

समारोपाच्या दिवशी, १० नोव्हेंबर रोजी ‘निरूपण’ हे संगीत नाटक सादर होणार आहे. हे नाटक ‘रंगपंढरी’ निर्मित आणि ईश्वर अंधारे लिखित-दिग्दर्शित आहे. दर्जेदार आणि तगडी संहिता असलेले आणि मधुर गीते असलेले हे नाटक पुण्यात होणाऱ्या आयपार इंटरनॅशनल थिएटर फेस्टिव्हल या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवामध्येही सादर होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पुलोत्सव तरुणाई आणि कृतज्ञता सन्मानही प्रदान होणार आहेत. महोत्सवातील सर्व कार्यक्रम रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहेत.

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या सांगतेची पार्श्वभूमी यंदाच्या ‘पुलोत्सवा’ला आहे. ‘पुलोत्सवा’तील कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZYGCG
Similar Posts
पुलोत्सव तरुणाई पुरस्कार अनघा मोडक यांना; सामाजिक कृतज्ञता सन्मान ‘सुहित जीवन ट्रस्ट’ला रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिक या संस्थांतर्फे रत्नागिरीत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुलोत्सवा’तील यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अचानकपणे दृष्टी गमावल्यानंतरही खचून न जाता संघर्षमय प्रवास करून निवेदक म्हणून प्रभावी कामगिरी करणाऱ्या अनघा मोडक यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्कार जाहीर झाला आहे
प्रियांका बर्वे पुलोत्सव तरुणाई पुरस्काराची मानकरी रत्नागिरी : पु. ल. देशपांडे यांच्या सासुरवाडीत म्हणजेच रत्नागिरीत ‘आर्ट सर्कल’तर्फे होणारा पुलोत्सव यंदा ‘पुलं’च्या जन्मशताब्दीमुळे अधिक उत्साहाने होणार आहे. सात ते नऊ डिसेंबर २०१८ या कालावधीत हा उत्सव रंगणार आहे. यंदाचा पुलोत्सव सन्मान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना, तर पुलोत्सव तरुणाई पुरस्कार
‘पुलं’च्या व्यक्तिरेखा भेटणार ‘पुलकित रेषां’मधून... रत्नागिरी : आर्ट सर्कल आणि ‘आशय सांस्कृतिक’तर्फे रत्नागिरीत होणार असलेल्या ‘पुलोत्सवा’मध्ये ‘पुलकित रेषा’ हे व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा विविध चित्रकारांच्या कुंचल्याच्या माध्यमातून त्या वेळी रसिकांना अनुभवता येणार आहेत. ‘चिंटू’ या लोकप्रिय
‘पुलं’ची शब्दकळा समाजजीवनाचे मर्म टिपणारी रत्नागिरी : ‘पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या लेखनात समाजजीवनाचे मर्म टिपले आणि नुसते सांगण्यापेक्षा काही तरी करून सांगावे अशी त्यांची शब्दकळा होती. ‘परफॉर्मन्स स्किल’ हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होता. तो मला भावला. त्यांच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळेमुळेच ज्यांना त्यांच्या आवाजाची सवय आहे, त्यांना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language